कॉम्पुटर व्हायरस म्हणजे काय? | computer virus information in marathi

कॉम्पुटर व्हायरस म्हणजे काय? (computer virus information in marathi)

विकिमित्र च्या सर्व वाचकांचे हार्दिक स्वागत !वाचकहो या लेखात आपण संगणकातील किंवा मोबाईल मधील व्हायरस बदल माहिती करून घेणार आहोत.
या लेखात खलील मुद्यांवर प्रकाश टाकला जाइल.
1.कॉम्पुटर व्हायरस म्हणजे काय?
2 .कॉम्पुटर व्हायरस चे प्रकार.
3.कॉम्पुटर मधील व्हायरस ओळखण्याची लक्षणे.
4.व्हायरस पासून वाचण्यासाठी च्या उपाय योजना.

कॉम्पुटर मधील व्हायरशा विषाणू रोबर ठोमर (rober thomer 1971) नामक इंजिनिअर ने 1971 मध्ये तयार केला.हा रोबर ठोमर इंजिनिअर बीबीएन technologies मध्ये काम करत असताना त्याने हा विषाणू तयार केला.
संगणकाच्या इतिहासामध्ये ELK Cloner हा संगणकामधील पहिला व्हायरस मानला जातो. ELK Cloner ह्या व्हायरस ला पहिल्यांदा फ्लॉपी डिस्क मधून शोधून काढले होते. Richard skrenta ह्यांनी हा व्हायरस शोधला .

Fred Cohen यांनी सन 1983 मध्ये malicious program ला संगणक व्हायरस असे नाव दिले.
आपण संगणक चालवतो म्हणजे आपण प्रोग्राम चालवतो. उदाहरण अर्थ ms word,ms excel, net surfing, power point presentation kiva आपण गेम्स खेळतो. आपण हे प्रोग्रॅम चालू केले की आपण ज्या कमांड देऊ ते काम हे संगणक करतात व क्लोज ही कमांड दिली की बंद होतात.

व्हायरस हा देखील एक प्रकारचा प्रोग्रॅम आहे.पण व्हायरस हा एका विशिष्ट पद्धतीने बनवला जातो, बनवलेल्या पद्धतीमुळे बनवणाऱ्याचा हेतू साध्य होतो.हा हेतू कोणत्या ही प्रकारचा असू शकतो,संगणकातील माहिती चोरून दुसरीकडे पाठवणे ,महत्वाची माहिती चोरी करणे,कॉम्पुटर मधील एखादा दुसरा प्रोग्रॅम बिघडवणे, व्हायरस हा सिपीयू किंवा मेमरी स्टोरेज चा अतिवापर करून संगणक मंद करण्याचे काम करतो.

संगणकातील व्हायरस देखील संसर्गजन्य असतात. म्हणजे ते इंटरनेट किंवा पेन ड्राईव्ह यांचा वाहक म्हणून वापर करून दुसऱ्या संगणकामध्ये जातात. शिवाय संगणकातील व्हायरस हा स्वतःला clone करून पसरत राहतो.

कॉम्पुटर व्हायरस चे प्रकार

1.वेब स्क्रिपटींग व्हायरस-(web scripting virus)-

वेबसाईट च्या लिंक,जाहिराती,प्रतिमा स्थान किंवा व्हिडीओज ला जोडलेला असतो.या वेबसाईट लिंक वर क्लिक केल्यावर malicious code आपल्या डिव्हाईस मध्ये डाउनलोड होतो.

2.ब्राऊजर हायजॅकर( browser hi-jacker)-

हा व्हायरस तुम्हाला तुमच्या परवानगी शिवाय दुसऱ्या संकेतस्थळावर घेऊन जातो,ह्या व्हायरस चा उपयोग जाहिरात करून पैसे कमावण्यासाठी केला जातो.

3.बूट सेक्टर व्हायरस (boot sector virus)
4.डायरेक्ट अकॅशन व्हायरस (direct action virus)
5.फाईल इंफेक्टर व्हायरस (file infector virus)
6.नेटवर्क व्हायरस (network virus)
7.मल्टिपारटाईट व्हायरस (multipartite virus)
8.मॅक्रो व्हायरस(macro virus)
9.resident virus
10.encrypted virus

कॉम्पुटर व्हायरस ची लक्षणे

1.कॉम्पुटर स्लो चालतो.
2.संगणकावर सारखे सारखे डायलॉग बॉक्स पॉप अप होतो.
3.काही प्रोग्रॅम आपोआप चालू होणे.
4.काही फाईली आपोआप मल्टी प्लाय होतात.
5.काही नवीन प्रोग्रॅम अपोआप सिस्टीम मध्ये इन्स्टॉल होतात.
6.काही फोल्डर आपोआप डिलिट होणे.
7.हार्ड ड्राइव्ह गरम होणे किंवा विशिष्ट प्रकारचा आवाज येणे.
8.अशी लक्षणे जर तुम्हाला दिसली तर समजून घ्या तुमच्या संगणकाला व्हायरस ने इनफेक्ट केले आहे, यासाठी लगेच संगणकामध्ये अँटीव्हायरस इन्स्टॉल बंद घ्यावा.
अँटीव्हायरस
Quick heal
Norton
McAfee
Avast
K7 virus
Avg antivirus
Kaspersky internet security
Bit defender

व्हायरस पासून वाचवण्यासाठी उपाययोजना

1.तुमच्या संगणकामध्ये नेहमी अँटीव्हायरस हा इन्स्टॉल असला पाहिजे व तो तुम्ही वेळेनुसार अपडेट केला पाहिजे.
2.कुठल्याही अनधिकृत वेबसाईट वरून काही डाउनलोड करू नका.
3.जर एखादा इ मेल आला आणि तुम्हाला त्याबद्दल काही माहिती नसेल तर तो ओपन करणे टाळा.
4.डाउनलोड केलेल्या फाईली स्कॅन करून घ्याव्या.
5.पेन ड्राईव्ह देखील स्कॅन करून वापरावा.
6.अनधिकृत संकेतस्थळांना भेट देणे टाळा.

आशा करतो की कॉम्पुटर व्हायरस म्हणजे काय? ( computer virus information in marathi) हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. जर तुम्हाला यामधून नवीन काही माहिती मिळाली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटुयात पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment